​एकूण लोकसंख्या​

0

एकूण कुटुंब

0

पुरुष

0

महिला

0

आपले गाव

केसलवाडा/पवार हे महाराष्ट्र राज्यातील भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यात वसलेले एक आदर्श व “स्मार्ट” ग्रामपंचायत गाव आहे. 381.51 हेक्टर क्षेत्रफळ असलेल्या या गावाची लोकसंख्या 1086 असून सामाजिक समरसतेचा आदर्श येथे पहावयास मिळतो. येथील प्रमुख व्यवसाय शेती असून धान यासारख्या पिकांचे उत्पादन घेतले जाते. याशिवाय दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन व लघुउद्योगही महत्वाची भूमिका बजावतात. गावात प्राथमिक ते कनिष्ठ महाविद्यालयापर्यंत शैक्षणिक सुविधा उपलब्ध असून आरोग्यासाठी सालेभाटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यरत आहे. “एक गाव एक कार्यक्रम” या उपक्रमांतर्गत पर्यावरणपूरक व सांस्कृतिक उपक्रम राबवले जातात, जसे की “एक गाव एक गणेशोत्सव”, “एक गाव एक जलसा”, यामुळे गावात एकात्मता आणि सामाजिक सलोखा निर्माण झाला आहे.  गावात श्रद्धेची आणि एकतेची जपणूक करणारी अनेक धार्मिक स्थळं आहेत – जसं की हनुमान मंदिर, मातामाई मंदिर, पाटील देव मंदीर, भंगाराम देवस्थान आणि बौद्ध विहार. ही ठिकाणं केवळ देवाची उपासना करण्यासाठी नाहीत, तर गावकऱ्यांच्या मनामनात श्रद्धा, संस्कार आणि सामाजिक एकतेचं बळ निर्माण करणारी ठिकाणं आहेत. त्याचबरोबर वीरश्री आणि बलिदानाचं प्रतीक असलेलं वीर बिरसा मुंडा आणि राणी दुर्गावर्तीचं स्मारक हे आमच्या सांस्कृतिक वारशाचं जिवंत दर्शन घडवतात.

श्री. देवेंद्र फडणवीस

माननीय मुख्यमंत्री

श्री. एकनाथ शिंदे

माननीय उपमुख्यमंत्री

श्री. अजित पवार

माननीय उपमुख्यमंत्री

श्री. पंकज जी भोयर

मा.पालकमंत्री – भंडारा

श्री सावन कुमार,भा.प्र.से

मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी भंडारा

ग्रामविकासाचे आधारस्तंभ

सौ. रोमिलाताई रामेश्वरजी बिसेन

सरपंच

श्री. अनिल पांडुरंगजी नंदेश्वर

उपसरपंच

श्री. दत्ता मारोतराव पोहरकर

ग्रामपंचायत अधिकारी

गावाचा विकासाचा आराखडा

केसलवाडा/पवार – आदर्श व स्मार्ट गावाचा मागील ६० वर्षांचा विकास आराखडा
सन - 1959
स्थापना
ग्रामपंचायतीची स्थापना

सन 1959 रोजी केसलवाडा/पवार ग्रामपंचायतीची स्थापना झाली. या स्थापनेनंतर गावाने हळूहळू पायाभूत सुविधा, सामाजिक विकास, आणि प्रशासनिक कार्यक्षमता या क्षेत्रांत महत्त्वपूर्ण प्रगती केली. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून रस्ते, वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य आणि स्वच्छता यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. आज केसलवाडा/पवार हे गाव आदर्श व स्मार्ट ग्राम म्हणून ओळखले जाते.

सन 1960
25 नोव्हेंबर 1960
जिल्हा परिषद शाळेची स्थापना

सन 25 नोव्हेंबर 1960 रोजी केसलवाडा/पवार गावातील जिल्हा परिषद शाळेची (Z.P. School) स्थापना करण्यात आली. या शाळेच्या स्थापनेमुळे गावातील शिक्षणाची पायाभरणी झाली आणि अनेक पिढ्यांना प्राथमिक शिक्षणाची संधी मिळाली. गेल्या अनेक दशकांत शाळेने शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात गावाच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचलला आहे. आजही ही शाळा गुणवत्तापूर्ण शिक्षण देत असून विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्यात मजबूत संबंध प्रस्थापित करून गावाचा शैक्षणिक दर्जा उंचावण्याचे कार्य करत आहे. उंचावण्याचे कार्य करत आहे.

सन 2005
तंटामुक्त गाव
तंटामुक्त गाव

वर्ष 2005 मध्ये केसलवाडा/पवार हे गाव "तंटामुक्त गाव" म्हणून घोषित करण्यात आले. ही उपाधी मिळवताना गावातील ग्रामस्थ, ग्रामपंचायत, सामाजिक कार्यकर्ते आणि युवा वर्ग यांनी एकत्रितपणे प्रयत्न करून गावातील वादविवाद, भांडणे आणि सामाजिक तणाव शांततेने सोडवले. न्यायनिवाडा ग्रामसभेमध्येच पारदर्शक पद्धतीने करण्यात येऊ लागला. या उपक्रमामुळे गावात सामाजिक सलोखा, शांतता, आणि एकोप्याचे वातावरण निर्माण झाले. "तंटामुक्त गाव" ही केवळ एक उपाधी नव्हे, तर गावाच्या एकसंघ, प्रगत आणि जबाबदार समाजाची ओळख ठरली.

सन 2007-08
तंटामुक्त गाव पुरस्कार
तंटामुक्त गाव पुरस्कार

वर्ष 2005 मध्ये केसलवाडा/पवार गावाने “तंटामुक्त गाव” म्हणून उल्लेखनीय यश संपादन केले आणि या कार्याची दखल घेत राज्य शासनाकडून गावाला 2007-08 या वर्षासाठी “तंटामुक्त गाव पुरस्कार” प्रदान करण्यात आला. या पुरस्काराअंतर्गत गावाला 2 लाख रुपयांचे रोख पारितोषिक मिळाले. या यशामागे ग्रामस्थांचे एकोप्याचे व शांततेचे वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न, ग्रामपंचायतीचे कुशल नेतृत्व आणि सामाजिक संघटनांचे योगदान महत्त्वाचे ठरले. मिळालेला निधी गावाच्या सामाजिक विकास आणि सार्वजनिक सुविधांच्या उभारणीसाठी उपयोगात आणण्यात आला

सन 2008-09
संत गाडगेबाबा पुरस्कार
संत गाडगेबाबा पुरस्कार

सन 2008-09 मध्ये केसलवाडा/पवार गावाला "संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान" अंतर्गत पुरस्कार मिळाला. ही गावासाठी अत्यंत गौरवाची बाब होती. विशेष म्हणजे, या कालावधीत गावाच्या इतिहासात पहिल्यांदाच एक आदिवासी महिला सरपंच पदावर विराजमान झाल्या, ज्यांनी प्रभावी नेतृत्व करत स्वच्छता, जनजागृती आणि सामाजिक सुधारणा यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. ग्रामस्थांच्या सहभागाने व या नेतृत्वाखाली गावात घनकचरा व्यवस्थापन, सांडपाण्याची योग्य व्यवस्था, स्वच्छता मोहिमा, आणि परिसर स्वच्छतेचे विविध उपक्रम यशस्वीरीत्या राबवले गेले.

सन 2023-24
जिल्ह्यात प्रथम क्रमांक
जिल्ह्यात प्रथम क्रमांक

सन 2023-24 मध्ये केसलवाडा/पवार गावाने स्वच्छतेच्या क्षेत्रात मोठे यश मिळवले. पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग यांच्या अंतर्गत राबविण्यात आलेल्या "संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान" व "राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा" या राज्यस्तरीय उपक्रमांत गावाने उत्स्फूर्त सहभाग घेतला. या स्पर्धेमध्ये केसलवाडा/पवार गावाने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आणि पुरस्कार स्वरूपात ₹ 6,00,000 (सहा लाख रुपये) रोख रक्कम मिळवली. ही रक्कम गावातील स्वच्छता उपक्रम, पायाभूत सुविधा आणि जनजागृतीसाठी वापरण्यात येणार आहे. या यशामागे गावातील ग्रामस्थांचा सहभाग, ग्रामपंचायतीचे योजनाबद्ध कामकाज, आणि सर्व संबंधित विभागांचे सहकार्य कारणीभूत ठरले.

सन 2023-24
3000 वृक्षांचे रोपण
भंडारा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते 3000 वृक्षांचे रोपण

भंडारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री. योगेश कुंभेजकर यांच्या हस्ते केसलवाडा/पवार गावात वृक्षारोपण उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. या उपक्रमांतर्गत 3000 वृक्षांचे रोपण करण्यात आले असून, पर्यावरण संरक्षण व हरितग्राम निर्माणाच्या दिशेने हा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे. या कार्यक्रमात स्थानिक ग्रामपंचायत, शालेय विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग होता. या वृक्षारोपण उपक्रमामुळे गावातील पर्यावरणीय समतोल राखणे, प्रदूषण कमी करणे आणि जैवविविधता वाढवणे हे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.

सन 2024-25
आर.आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार ​
आर.आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार ​

सन 2024-25 मध्ये केसलवाडा/पवार गावाने “आर.आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार” मिळवून तालुका स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला. या पुरस्कारासाठी गावाची सामाजिक एकता, स्वच्छता, पायाभूत सुविधा, पर्यावरणपूरक उपक्रम, आणि लोकसहभागावर आधारित विकास या घटकांमुळे निवड झाली. पुरस्कार स्वरूपात ₹ 10,00,000 (दहा लाख रुपये) रोख रक्कम गावाला प्रदान करण्यात आली. या यशामागे गावातील ग्रामस्थांचा समर्पित सहभाग, ग्रामपंचायतीचे प्रभावी नेतृत्व आणि शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी कारणीभूत ठरली आहे. या निधीचा उपयोग गावाच्या सर्वांगीण विकासासाठी, विशेषतः स्वच्छता, हरितग्राम निर्मिती, व पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी करण्यात येणार आहे.

17 जून 2025
५००० वृक्षारोपणाचा संकल्प
जिल्हाधिकारी संजय कोलते यांच्या हस्ते ५००० वृक्षारोपणाचा संकल्प

दि. 17 जून 2025 रोजी भंडारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री. संजय कोलते यांच्या हस्ते केसलवाडा/पवार गावात वृक्षारोपण उपक्रमाची भव्य सुरुवात करण्यात आली. या उपक्रमांतर्गत 5000 वृक्ष लावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, पर्यावरण संवर्धन, हरितग्राम निर्मिती आणि जैवविविधतेच्या संवर्धनासाठी हा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे. या कार्यक्रमात ग्रामपंचायत सदस्य, स्थानिक शाळा, स्वयंसेवी संस्था, शेतकरी आणि ग्रामस्थांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. वृक्षारोपणानंतर झाडांच्या देखभाल व संवर्धनासाठी विशेष समितीची स्थापना करण्यात आली असून, या उपक्रमामुळे गावात पर्यावरणपूरक वातावरण निर्माण होण्यास निश्चितच मदत होणार आहे.

पदाधिकारी

सौ. रोमिला रामेश्वर बिसेन सरपंच
श्री. अनिल पांडुरंग नंदेश्वर उपसरपंच
सौ छ्न्नु झनक रहांगडाले सदस्य
सौ वंदना श्रीनंदलाल नंदेश्वर सदस्य
सौ. अंजिरा संजय नान्हे सदस्य
श्री. रामेश्वर राधेलाल बिसेन सदस्य
श्री. अमित आनदराव खेडीकर सदस्य

"केसलवाडा पवार ग्रामपंचायत – सुविधा संपन्न आणि पर्यावरण पूरक आदर्श गाव"

एकूण हनुमान मंदिर - 2
जि. प. शाळा - 1
कनिष्ठ कला महाविद्यालय - 1
एकूण अंगणवाडी - 1
तलाठी कार्यालय - 1
रेशन दुकान - 1
एकूण किराणा दुकाने - 4
एकूण तलाव - 1
स्मशान भूमी - 1
टॉवर वोडाफोन - 1
बिरसा मुंडा स्मारक - 1
एकूण सार्वजनिक विहीर - 6
पाणी टाकी 55000 लिटर - 1
एकूण वार्ड - 3
एकूण हातपंप - 11
एकूण प्रवेशद्वार - 2
एकूण सार्वजनिक शौचालय - 1
एकूण नळ कनेक्शन - 256
बौद्ध विहार - 1
एकूण गोबर गॅस - 154
एकूण शोषखड्डे - 285
एकूण कचरा कुंड्या - 20
एकूण वृक्ष संख्या - 3500
एकूण महिला बचत गट - 20
ग्रामसंघ - 1

केसलवाडा पवार – गावाच्या उपलब्धींचा आरसा

गावाच्या प्रवेशद्वारावर लावलेला हा डिस्प्ले बोर्ड म्हणजे केसलवाडा पवार ग्रामपंचायतीच्या यशोगाथेचा दर्पण आहे. गावाने आतापर्यंत साध्य केलेल्या विविध उपक्रमांची आणि पुरस्कारांची माहिती येथे आकर्षक पद्धतीने सादर केली आहे.

केसलवाडा पवार ग्रामपंचायतीचा हरित संकल्प : 5 हजार वृक्ष लागवड

ग्रामपंचायत केसलवाडा पवार यांनी पर्यावरण संवर्धनासाठी 5000 वृक्ष लागवडीचा महत्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाचा शुभारंभ महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मा. जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांच्या शुभहस्ते 17 जून रोजी सकाळी 9.30 वाजता करण्यात आला. नरेगा योजनेच्या माध्यमातून 5000 वृक्ष लागवड करण्याचा मानस ग्रामपंचायतीने व्यक्त केला असून हा हरित संकल्प गावाच्या शाश्वत विकासासाठी मोलाचा ठरणार आहे.

दि. 5 जून 2025 रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ग्रामपंचायत केसलवाडा पवार यांनी मामा तलावाच्या पाळीवर वृक्षारोपण करून हरित अभियानाची सुरुवात केली. हा उपक्रम पर्यावरण संवर्धनासाठी एक मोलाचे पाऊल ठरला आहे. ग्रामपंचायतीने वर्षभरात एकूण 5000 वृक्ष लागवडीचा महत्वाकांक्षी संकल्प केला असून या माध्यमातून गावाचा शाश्वत विकास साध्य करण्याचा प्रयत्न आहे. या हरित उपक्रमासाठी डॉ. आदिनाथ दुकारे (कृषी तंत्रज्ञ, दिल्ली), डॉ. प्रशांत उबरकर (कीटकशास्त्रज्ञ), डॉ. पर्वते (कृषी पर्यवेक्षक, लाखनी) व प्रशांत भोयर (कृषी सहाय्यक) उपस्थित राहून मार्गदर्शन केले.

ग्रामपंचायत केसलवाडा पवार ने पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबविला आहे. गावातील मुख्य रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना वृक्षारोपण करण्यात आले असून, या उपक्रमामुळे गावाचे सौंदर्य वाढले आहे तसेच पर्यावरणीय फायदेही मिळत आहेत. वृक्षारोपणामुळे हवेची गुणवत्ता सुधारली आहे, उष्णतेपासून बचाव झाला आहे, आणि स्थानिक पक्ष्यांचे व जीवजंतूंचे आश्रयस्थान तयार झाले आहे. ग्रामपंचायतीच्या या पुढाकारामुळे गावातील सार्वजनिक जागा हिरवळीत सजल्या आहेत आणि नागरिकांसाठी आरामदायी व नैसर्गिक वातावरण निर्माण झाले आहे. हा उपक्रम गावात सतत हरित अभियान चालू ठेवण्यास मदत करेल तसेच पुढील पिढ्यांसाठी पर्यावरण संवर्धनाची जागरूकता वाढवेल.

केसलवाडा पवार गावाचे व्हिडिओ

ग्रामपंचायतच्या भिंतींवरून जनजागृतीचा रंगमंच

केसलवाडा आणि ग्रामपंचायत कार्यालयाच्या आसपासच्या भिंतींवर रंगवलेली भित्तीचित्रे ही केवळ सजावट नसून, ती गावाच्या सामाजिक, पर्यावरणीय आणि शैक्षणिक जाणीवांचा सजीव दस्तावेज आहे. या भित्तीचित्रांमधून विविध शासकीय योजना, स्वच्छता मोहिमा, पर्यावरण संवर्धन, पाणी बचत, शिक्षण आणि आरोग्य यासंबंधीचे संदेश प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवले जात आहे.

ग्रामस्तरीय समितीचे नाव

फोटो गॅलरी

घटना आणि बातम्या

ग्रामपंचायत पुरस्कार-२०२५

ग्रामपंचायत – प्रमाणपत्रे

ग्रामपंचायतची भौगोलिक क्षेत्र

381.51 हे. आर.

भौगोलिक क्षेत्र

175.95 हे. आर.

लागवडीयोग्य क्षेत्र

21.16 हे. आर.

पडीत जमिनीचे क्षेत्र

5.23 हे. आर.

गावठाण जमिनीचे क्षेत्र

164.77 हे. आर.

वनजमिनीसाठी क्षेत्र

मराठी, हिंदी

बोली भाषा

हेल्पलाईन नंबर्स

100

पोलीस

108

रुग्णवाहिका

100

महिला संरक्षण

1098

बाल हेल्पलाईन