


“बेटी बचाओ, बेटी पढाओ” हे भारत सरकारचे महत्त्वाचे अभियान असून याचा उद्देश मुलींच्या जन्माचे प्रमाण ( लिंग गुणोत्तर ) सुधारणे, त्यांना समान दर्जा मिळवून देणे, शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे आणि सुरक्षितता सुनिश्चित करणे हा आहे. ही योजना विशेषतः त्या जिल्ह्यांमध्ये प्रभावीपणे राबविली जाते, जिथे मुलींचा जन्मदर अपेक्षेपेक्षा कमी आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमार्फत समाजात मुलींबाबत सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करण्यासाठी विविध जनजागृती उपक्रम आणि कृतीशील कार्यक्रम राबविले जातात.

एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत, अंगणवाडी सेविकेमार्फत बालकांना आरोग्य सेवा, पोषण आहार आणि पूर्वप्राथमिक शिक्षण दिले जाते. या सेवांचा दर्जा सुधारण्यासाठी आदर्श अंगणवाडी केंद्रांची निर्मिती केली जाते. आदर्श अंगणवाडी केंद्रांमध्ये मुलांना आनंददायी, स्वच्छ व सुरक्षित वातावरणात शिक्षण आणि पोषण मिळते. यासोबतच, किशोरवयीन मुली आणि महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न केला जातो.

महाराष्ट्र शासनाने “माझी कन्या भाग्यश्री” (सुधारीत) या योजनेला अधिक्रमित करून, १ एप्रिल २०२३ पासून “लेक लाडकी” योजना सुरू केली आहे. ही योजना केवळ पिवळ्या किंवा केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबातील मुलींसाठी लागू असून, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹१ लाखांपेक्षा जास्त नसावे.

महाराष्ट्र शासनाच्या मंजुरीनुसार, पहिल्या प्रसूतीवेळी नवजात बालकासाठी आणि मातेसाठी आवश्यक असलेल्या वस्तूंचा समावेश असलेला ₹2000 किंमतीचा “बेबी केअर किट” मोफत देण्यात येतो.
या योजनेचा उद्देश शासकीय आरोग्य केंद्रांमध्ये प्रसूतीला प्रोत्साहन देणे, माता व बालकाच्या आरोग्याची काळजी घेणे आणि बाल मृत्यू दर कमी करणे हा आहे.
| वर्ष | मुले | मुली | एकूण संख्या |
|---|---|---|---|
| 2023-2024 | 36 | 41 | 77 |
| 2024-2025 | 30 | 33 | 63 |
| 2025-2026 | 25 | 29 | 54 |
ग्रामपंचायत केसलवाडा/पवार अंतर्गत अंगणवाडीत नियमित लसीकरण मोहिम राबविण्यात आली. या उपक्रमाद्वारे लहान मुलांना विविध रोगांपासून संरक्षण मिळावे यासाठी आवश्यक त्या लसी देण्यात आल्या. पालकांना लसीकरणाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले असून, बालकांच्या निरोगी भविष्यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला आहे.
ग्रामपंचायत केसलवाडा/पवार अंतर्गत आंगणवाडीत मुलांच्या पालकांना शिधा वाटप करण्यात आले. या उपक्रमातून कुपोषण रोखणे, मुलांचे पोषणमूल्य वाढवणे तसेच कुटुंबांना सहाय्य मिळणे हे उद्दिष्ट ठेवले आहे. पालकांना शिधा वाटप करताना पोषणाबाबत जनजागृती करण्यात आली असून, बालकांच्या आरोग्य व विकासासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला आहे.
अंगणवाडी केसलवाडा/पवार येथे महिलांसाठी माता सभा आयोजित करण्यात आली. या सभेत गर्भवती माता, स्तनदा माता व बालकांच्या पालकांना पोषण, स्वच्छता, आरोग्य, लसीकरण व कुपोषण प्रतिबंध याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. महिलांचा सक्रिय सहभाग असून, मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी व कुटुंबांच्या आरोग्यदायी भविष्यासाठी हा उपक्रम प्रभावी ठरत आहे.
अंगणवाडी केसलवाडा/पवार परिसरात एच.बी.एन.सी. (Home Based Newborn Care) भेट घेण्यात आली. या भेटीदरम्यान नवजात बालकाचे आरोग्य, वजन, आहार, स्वच्छता तसेच माता व बालकाच्या आरोग्यविषयक गरजा तपासण्यात आल्या. तसेच मातांना स्तनपानाचे महत्त्व, स्वच्छता पाळण्याचे नियम व बालकाची योग्य काळजी कशी घ्यावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमामुळे नवजात शिशूंच्या आरोग्य संरक्षणास मोठी मदत मिळत आहे
केसलवाडा (पवार)
केसलवाडा/पवार ग्रामपंचायत ही "स्मार्ट ग्रामपंचायत, डिजिटल ग्रामपंचायत" या दृष्टिकोनातून कार्यरत असून, पारदर्शक व उत्तरदायी प्रशासन, डिजिटल सेवा, पर्यावरणपूरक उपक्रम, आणि सर्वांगीण ग्रामीण विकास हे आमचे ध्येय आहे. "सशक्त ग्राम, सक्षम प्रशासन" हे ध्येय ठेवून गावाचे स्मार्ट व्हिलेजमध्ये रूपांतर करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.